सेन्सेक्स २१० अंकांनी वधारला

मुंबई | १२ सप्टेंबर २०२५
आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंग दिवशी शेअर बाजारात उत्साहवर्धक
सुरुवात झाली.
- बीएसई सेन्सेक्स २१०
अंकांनी (०.२६%) वाढून उघडला.
- निफ्टी ५० २५,००० अंकांच्या वर पोहोचला.
- इन्फोसिसच्या
शेअर्समध्ये लक्षणीय वाढ दिसून आली.
जागतिक बाजाराचा प्रभाव
अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक बाजार मजबूत झाल्याने भारतीय बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला
आहे.
- अमेरिकन बाजारात
तेजी :
- डाउ जोन्स १.३६%
वाढला
- एस अँड पी ५०० –
०.८५% वाढ
- नॅस्डॅक – ०.७२%
वाढ
- आशियाई बाजारात तेजी :
- हाँगकाँग हँग सेंग
– १.६५% वाढ
- जपान निक्केई –
०.५६% वाढ
- दक्षिण कोरिया
कोस्पी – १.१५% वाढ
- चीन सीएसआय ३०० –
०.०१% वाढ
फेडरल रिझर्व्ह निर्णयाची प्रतीक्षा
१७ सप्टेंबर रोजी यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात (२५
बेसिस पॉइंट्स) करेल अशी अपेक्षा आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आशावाद वाढला
असून, बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.