जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून ज्येष्ठ पत्रकार टी. के. मलगोंड यांची नियुक्ती
विजयपूर* : - कर्नाटकमधील कार्यरत पत्रकार संघाच्या 2025-2028 या कार्यकाळासाठी विजयपूर जिल्हा कार्यरत पत्रकार संघाच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याच्या पदासाठी ज्येष्ठ पत्रकार टी. के. मलगोंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राज्य निवडणूक अधिकारी एन. रवीकुमार यांनी आदेश जारी करून केली आहे. निवडणूक नियमांनुसार व संघटनेच्या बायेला (घटने) प्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान बायेला घटने संबंधित अधिक माहिती आवश्यक असल्यास राज्य निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार टी. के. मलगोंड यांची जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सलग तिसऱ्यांदा नियुक्ती झाली आहे, हे उल्लेखनीय आहे. निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी ते परिचित आहेत.