संजय राऊतांचा स्फोटक आरोप : “शिंदे गटाचा कोथळा अमित शहा काढणार!”; महायुतीवर जोरदार हल्लाबोल.

प्रकृतीच्या कारणामुळे काही आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज पुन्हा एका स्फोटक पत्रकार परिषदेत माध्यमांसमोर हजर झाले. सुरुवातीलाच त्यांनी महायुती सरकार, शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. शिंदे गटाचा कोथळा अमित शहाच काढणार” – राऊतांचा खळबळजनक दावा पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले:

शिंदे गटाचा कोथळा अमित शहाच काढणार, हे लिहून ठेवा. शिंदे गटातील ३५ आमदार फुटणार असून, भाजपने यासाठी रवींद्र चव्हाण यांची नेमणूक केली आहे.” राऊतांच्या या विधानाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नगरपालिका–नगरपंचायत निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस

राऊत पुढे म्हणाले:

  • नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये कधीही इतका पैशाचा खेळ झाला नव्हता.”
  • निवडणुका स्थानिक पातळीवर लढविल्या जायच्या. आता हेलिकॉप्टर, विमानांचे राजकारण सुरू झाले आहे.”
  • सत्ताधारी तिन्ही पक्ष एकमेकांविरुद्धच लढत आहेत.”

ते म्हणाले, कोट्यवधी रुपये खर्चून कोणासाठी लढताय? आपापसातील मारामारी थांबवा.”

प्रकृती सुधारतेय; उपचार कठोर – राऊत

स्वतःच्या तब्येतीबाबत बोलताना ते म्हणाले:

  • मी काही दिवस वैद्यकीय कैदेत होतो.”
  • रेडिएशनची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.”
  • डिसेंबरमध्ये पूर्ण बरा होईल.”
  • उद्धव ठाकरे काळजी घेत आहेत.”

देवेंद्र फडणवीसांनी आजारपणात फोन करून चौकशी केल्याचेही त्यांनी सांगितले.

शिंदे गँगचे लक्ष्मी दर्शन… आयोगाने लक्ष द्यावे”

राऊतांनी आरोप केला की:

  • उद्या लक्ष्मी दर्शन होणार असे शिंदे गँग सांगत आहे.”
  • निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी.”
  • शिंदेंना वाटतं दिल्लीतील दोन नेते त्यांच्यासोबत आहेत; पण ते कोणाचेच नाहीत.”

ते पुढे म्हणाले— "शिंदे गट हा अमित शहाने तयार केलेला गट आहे.

पैशाने लोकशाही चालत नाही — राऊतांचा जोरदार टोला

ते म्हणाले:

  • पैशावर निवडणुका लढणे म्हणजे लोकशाही नाही.”
  • फडणवीसांचे राजकारण शिंदेंना कळत नसेल, तर त्यांनी राजकारण करू नये.”
  • पैशाने लोक विकत घेता येतात, पण लोकशाही नाही.”