रशियन पर्यटक महिलेचा भारतातील मुलांवर संताप; रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल सुनावलं जोरदार भाषण, किरेन रिजिजू यांचीही प्रतिक्रिया

नवी दिल्ली | Russian Tourist Rage
भारतामध्ये एका रशियन पर्यटक महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ती रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या काही मुलांना फटकारताना दिसत आहे. या घटनेनंतर अनेक नेटिझन्सनी तिच्या कृतीचं कौतुक करत स्वच्छतेबाबत जागरूकतेचा संदेश दिला आहे. हा व्हिडिओ मीना फाइंड्स (Meena Finds) नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यावर हजारो प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महिलेने व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे — "म्हणूनच शिक्षण महत्त्वाचं आहे. भारतीय मुलांशी संभाषण चुकीचं झालं." व्हिडिओमध्ये दिसतं की, महिला काही मुलांना रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्यास सांगते. मात्र मुलं तिच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यावर ती कठोर स्वरात म्हणते, "तुम्ही काय केलं? तुम्ही कचरा टाकलात. तो उचला आणि कचरापेटीत टाका. हा तुमचा देश आहे, जोपर्यंत तुम्ही असं करत राहाल तोपर्यंत तुम्ही कचऱ्यातच राहाल."

महिलेच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं —

कृपया संवेदनशील रहा.”

रिजिजू यांच्या या प्रतिक्रियेनंतर अनेकांनी या घटनेला स्वच्छ भारत” अभियानाशी जोडून सकारात्मक संदेश म्हणून पाहिलं आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

अनेक वापरकर्त्यांनी महिलेच्या संतापाला दुजोरा दिला आहे.

  • एका युजरने लिहिलं, मुलांना लहानपणापासून स्वच्छतेचे शिक्षण देणं गरजेचं आहे.”
  • दुसऱ्याने म्हटलं, आम्हाला वाईट वाटतं की तुम्हाला हे सर्व भारतात पाहावं लागलं.”
    काहींनी तर “पर्यटक असूनही तिने देशाच्या स्वच्छतेसाठी आवाज उठवला” असे म्हणून तिचे कौतुक केले.