"रशियाला पुन्हा भूकंपाचा तडाखा – कामचटका बेटाजवळ ७.८ रिश्टर स्केलचा धक्का, त्सुनामीचा इशारा"

मॉस्को | १9 सप्टेंबर २०२५
रशियाला पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचा तडाखा बसला आहे. कामचटका
बेटाजवळ ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून तातडीने त्सुनामीचा इशारा जारी
करण्यात आला आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे फर्निचर, गाड्या आणि दिवे जोरात हलताना सोशल मीडियावरचे व्हिडिओ समोर आले आहेत.
नागरिक घाबरून घराबाहेर पडले. अद्याप जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर नुकसान
झाल्याची माहिती नाही.
आधीही झाले भूकंप
- याच प्रदेशात एक
आठवड्यापूर्वी ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
- १५ सप्टेंबर रोजी
६.० रिश्टर स्केल, तर १३
सप्टेंबर रोजी ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
- यापूर्वी
जुलैमध्येही कामचटका येथे ८.८ रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला गेला होता.
अधिकृत माहिती
कामचटका प्रदेशाचे गव्हर्नर व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी टेलिग्रामवर
सांगितले की,
“पूर्व किनाऱ्यावर त्सुनामीचा धोका निर्माण
झाला आहे, नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.”
अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार, भूकंप पेट्रोपाव्लोव्स्क-कामचटस्की शहराच्या
पूर्वेस १११ किमी अंतरावर, ३९.५ किमी खोलीवर नोंदवला गेला.
हायलाइट्स
- कामचटका प्रदेशात
७.८ रिश्टर स्केलचा भूकंप
- त्सुनामीचा इशारा
जारी
- रहिवाशांमध्ये
भीतीचं वातावरण
- महिन्याभरात तीन
मोठे भूकंप