RBI ने रेपो दर कायम ठेवला; घरखरेदीदार व कर्जदारांना दिलासा नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) ४ ते ६
ऑगस्ट दरम्यान झालेल्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. सलग तीन वेळा
व्याजदर कपातीनंतर हा निर्णय घेतला गेला आहे. यावेळी रेपो दर ५.५% वर कायम
ठेवण्यात आला आहे. |
विकास दराचा अंदाज कायम RBI ने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी दर ६.५% इतकाच
राहील, असा पुनरुच्चार केला आहे. तिमाही अंदाज खालीलप्रमाणे
देण्यात आला आहे:
- Q1: 6.5%
- Q2: 6.7%
- Q3: 6.6%
- Q4: 6.3%
रेपो दरात यापूर्वी झालेली कपात:
- फेब्रुवारी: 25 बेसिस पॉइंट्स कपात (6.25%)
- एप्रिल: आणखी 25 बेसिस पॉइंट्स कपात
- जून: 50 बेसिस पॉइंट्स कपात (5.5%)
गुंतवणूकदार व गृहकर्ज धारकांमध्ये समाधान, पण
पुढील कपातीची वाट पाहत आहेत.