अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला राज ठाकरे : मनसे देणार बी-बियाणे, खते व अवजारे

मुंबई | सप्टेंबर २०२५
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांमध्ये पिके वाहून गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळाऐवजी दुष्काळाच्या सवलती लागू करण्याची घोषणा केली असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

राज ठाकरे मदतीला सरसावले
या संकटाच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. पूरग्रस्तांना केवळ अन्नधान्य व कपड्यांपुरती मदत न करता मनसे नवसंजीवनी’ या संकल्पनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीसाठी आवश्यक साहित्य पुरवले जाणार आहे.

काय मिळणार शेतकऱ्यांना?

  • बी-बियाणे
  • खते
  • शेती अवजारे

राज ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पूरग्रस्त गावांची पाहणी करून मदत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांचा भार कमी करण्याचा प्रयत्न
पूरामुळे उभी पिके वाहून गेल्याने शेतकरी कर्जबाजारीपणाच्या गर्तेत सापडला आहे. सरकारची मदत अपुरी ठरण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज काढावे लागू नये म्हणून मनसेकडून थेट शेतीसाठी लागणारे साहित्य पुरवले जात आहे.

हायलाइट्स

  • अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्यभरात शेतीचे नुकसान
  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली आर्थिक मदत
  • राज ठाकरेंची ‘मनसे नवसंजीवनी’ योजना सुरू
  • शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते आणि अवजारे थेट मदत म्हणून दिली जाणार