शहरात आणि महामार्गावर साचले पावसाचे पाणी

सोलापुर : सतत सुरू असलेल्या पावसाने शहरातील ओढे नाले
भरून वाहू लागले असून पूना नाका येथील ओढ्यावरून मोठया प्रमाणात पाणी वाहू
लागल्याने मडकी वस्तीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे, तर वसंत विहार परिसरात देखील नाल्याच्या बाहेरून पाणी वाहू लागले आहे,
तर सोलापुर धुळे महामार्गावर मोठया प्रमाणात पाणी साचल्याने
वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत