मावा अड्ड्यावर छापा – कच्चा मालसह लाखो रुपयांच्या वस्तू जप्त

विजयपूर:- जिल्ह्यातील मुद्धेबिहाळ आणि ताळिकोटी शहरांमध्ये अनधिकृत मावा निर्मिती अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली असून, लाखो रुपयांचा कच्चा माल आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे  मुद्धेबिहाळ शहरातील संगमेश्वर नगरचे सलीम खुदानसाब पडेकनूर (वय 48), रमेश गणप्पा पुजारी (वय 53) आणि ताळिकोटी शहरातील खत्री बाजारजवळचे रहिवासी मोहम्मदरसूल महिबुबसाब ममदापूर (वय 54) यांना अटक करण्यात आली आहे   मुद्धेबिहाळ आणि ताळिकोटी येथील खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी या अड्ड्यांवर छापा टाकून कच्चा मावा, सुपारी, तंबाखू, चुन्याच्या डब्या, मिक्सर, वजन काटा अशा वस्तूंसह दोन्ही ठिकाणांहून मिळून एकूण 118.6 किलो कच्चा माल आणि एकूण रु 79,469 रुपयांच्या वस्तू जप्त केल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी आणि एएसपी रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी सुनील कांबळे, पीएसआय रवी यडवन्नवर, बी. एम. पवार, वाय. एस. जमखंडी, पी. एम. टक्कोड, एस. एस. बी. बिरादार, आर. आय. लोणी, आर. डी. अंजुटगी, अबुबकर गद्याळ, डी. आर. पाटील, एस. आर. बडची या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.