राहुल गांधींचा आरोप : महाराष्ट्रात निवडणुकीत मोठा घोटाळा, ४० लाख रहस्यमय मतदार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील मतदान प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ४० लाख 'रहस्यमय' मतदारांचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली. |
"महाराष्ट्रात चोरी झाली आहे" - राहुल गांधी राहुल गांधी म्हणाले, "महाराष्ट्रात आम्ही निवडणूक हरलो, पण ती हरवली गेली. ४० लाख मतदार रहस्यमय आहेत. पाच महिन्यांत लाखो नवे मतदार नोंदवले गेले." त्यांनी दावा केला की निवडणूक आयोगाकडे या संदर्भात अनेक वेळा माहिती मागवूनही इलेक्ट्रॉनिक डेटा देण्यास नकार देण्यात आला. "निवडणूक आयोग आकडेवारी देत नाही, आम्हाला उत्तर नाकारत आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक आहे," असे ते म्हणाले. बिहारनंतर महाराष्ट्रावर लक्ष गेल्या काही आठवड्यांपासून राहुल गांधी निवडणूक आयोगावर सातत्याने टीका करत असून, याआधी बिहारमधील मतदार यादी पुनरावलोकनावरही त्यांनी आवाज उठवला होता. निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी
राहुल गांधी यांनी स्पष्ट मागणी केली की, "या मतदार यादीबाबत संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. हे मतदार खरे आहेत की खोटे हे देशाला समजले पाहिजे." या गंभीर आरोपांवर निवडणूक आयोग किंवा सत्ताधाऱ्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.