"पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे – देश बदलणाऱ्या मोदी सरकारच्या १० महत्वाच्या योजना"

नवी दिल्ली | १७ सप्टेंबर २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७५ वर्षांचे झाले. १७ सप्टेंबर १९५० रोजी जन्मलेले मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने अनेक लोकाभिमुख योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा उद्देश – प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे आणि मूलभूत गरजा पूर्ण करणे हा राहिला आहे.

 मोदी सरकारच्या १० प्रमुख योजना

1.       पंतप्रधान आवास योजना (२०१५)२०२५ पर्यंत ४२.१ दशलक्ष घरे बांधली; ग्रामीण भागात आणखी २० दशलक्ष घरे बांधण्याची मंजुरी.

2.      जन धन योजना (२०१४)५६० दशलक्षांहून अधिक बँक खाते; महिलांच्या नावावर निम्म्याहून अधिक.

3.      अटल पेन्शन योजना (२०१५)असंघटित क्षेत्रातील नागरिकांना ,००० ते ,००० मासिक पेन्शन.

4.      उज्ज्वला योजना (२०१६)१०३ दशलक्ष एलपीजी कनेक्शन गरीब कुटुंबांना.

5.      प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (२०१५)केवळ २० वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा अपघात विमा.

6.     प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (२०१५) – ₹४३६ प्रीमियमवर २ लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण.

7.      आयुष्मान भारत योजना (२०१८)५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार; ३४७ दशलक्ष कार्ड जारी.

8.     पीएम किसान सन्मान निधी (२०१९)दरवर्षी ,००० मदत; २० हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.

9.     गरीब कल्याण अन्न योजना (२०२०)८० कोटी लोकांना ५ किलो मोफत धान्य; योजना २०२९ पर्यंत वाढवली.

10.  प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना (२०२४)दरमहा ३०० युनिट मोफत वीज; १० लाख घरांमध्ये सौर पॅनेल बसवले.

या योजनांमुळे पंतप्रधान मोदींच्या धोरणांचा थेट परिणाम गरीब, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला आहे.