प्रेमानंद महाराजांच्या तब्येतीत बिघाड; दोन्ही किडन्या निकामी, दररोज करावा लागतो डायलिसिस

प्रसिद्ध संत आणि प्रवचनकार प्रेमानंद महाराज यांच्या तब्येतीबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. महाराजांना गंभीर किडनीचा आजार झाला असून त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे ते दररोज डायलिसिसवर आहेत. काही दिवसांपासून त्यांची तब्येत अधिक बिघडल्याची माहिती मिळत आहे. आरोग्याच्या कारणास्तव प्रेमानंद महाराजांनी भक्तांना भेटणे कमी केले असून त्यांच्या दैनंदिन तीर्थयात्राही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

 प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार?

महाराजांना झालेला आजार म्हणजे Polycystic Kidney Disease (PKD) — जो किडनीशी संबंधित एक अनुवांशिक (Genetic) विकार आहे. या आजारात किडनीमध्ये पाण्याने भरलेल्या सिस्ट तयार होतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि शेवटी किडनी फेल्युअर होऊ शकते. 2006 साली या आजाराचे निदान झाले होते. महाराजांनी अनेक प्रवचनांमध्ये स्वतः सांगितले आहे की त्यांना दररोज डायलिसिस घ्यावा लागतो.

 या आजाराचे दोन प्रकार असतात:

ADPKD (Adult Polycystic Kidney Disease) – प्रामुख्याने प्रौढांमध्ये आढळतो.
 ARPKD (Autosomal Recessive PKD) – दुर्मिळ आणि बालकांमध्ये दिसतो. या आजारात किडनीचा आकार वाढतो, लघवीत रक्त येते, वारंवार इन्फेक्शन होते आणि उच्च रक्तदाब कायम राहतो.

 हा आजार किती धोकादायक आहे?

वैद्यकीय अभ्यासानुसार, PKD रुग्णांचा मृत्यूदर सामान्य लोकांपेक्षा 2 ते 3 पट जास्त असतो.
PubMed च्या अहवालानुसार, किडनी फेल्युअरपूर्व अवस्थेत 18.4 प्रति 1000 रुग्ण/वर्ष मृत्यूदर आहे, तर पूर्ण किडनी फेल्युअर (ESRD) टप्प्यावर हा दर 37.4 प्रति 1000 रुग्ण/वर्ष होतो.

अमेरिकेच्या National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases (NIDDK) च्या मते, वेळेत उपचार न झाल्यास किडनी फेल्युअर आणि मृत्यूचा धोका प्रचंड वाढतो.

 उपचार आणि प्रतिबंध

सध्या या आजारावर पूर्ण इलाज नाही, पण लवकर निदान आणि योग्य व्यवस्थापन केल्यास परिस्थिती नियंत्रित ठेवता येते.

  • अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, एमआरआय किंवा जिनेटिक टेस्टिंगद्वारे ओळखता येते.
  • लो-सॉल्ट डाएट, नियमित डायलिसिस, आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार यामुळे किडनीचे कार्य काही प्रमाणात टिकवून ठेवता येते.

 भक्तांमध्ये चिंता, प्रार्थनांचा वर्षाव

प्रेमानंद महाराजांच्या तब्येतीची बातमी समोर आल्यानंतर देशभरातील भक्त चिंतेत आहेत.
त्यांच्या आरोग्यासाठी भक्तांकडून सतत प्रार्थना, सामूहिक हवन आणि पूजा आयोजित केल्या जात आहेत.