पुण्यात पोलिसांची अंमली पदार्थांवर धडक कारवाई; ४ किलोपेक्षा अधिक गांजा जप्त

पुणे :- शहरातील अंमली पदार्थांच्या विक्रीवर
अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी रात्री मोठी मोहीम राबवली. परिमंडळ ४ हद्दीत
राबवलेल्या या विशेष कारवाईत तब्बल ५३ जणांची अंगझडती, घरझडती
आणि वाहन तपासणी करण्यात आली. या मोहिमेत सहा आरोपींवर चार गुन्हे दाखल करून ८८,६६० रुपये किंमतीचा एकूण ४ किलो ६६४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. कारवाई
गुरुवारी रात्री ९ वाजल्यापासून सुरू करण्यात आली होती. या मोहिमेत परिमंडळ ४ चे
पोलीस उपआयुक्त सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार ३६ अधिकारी व १३३ पोलीस अमलदार
सहभागी झाले. अंमली पदार्थांच्या अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम
अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस
उपआयुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) प्रांजली
सोनवणे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (खडकी विभाग) विठ्ठल दबडे यांच्या
मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिसांनी सांगितले की, “शहरातील
अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा नियमितपणे
राबवल्या जातील. अवैध धंद्यावर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.”