गोव्यात आज पीएम मोदींकडून जगातील सर्वात उंच भगवान रामाच्या पुतळ्याचे अनावरण; ७७ फूट उंच कांस्य मूर्ती लोकापर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दक्षिण गोव्यातील ऐतिहासिक श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठात भगवान रामाच्या जगातील सर्वात उंच ७७ फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. हा भव्य पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी तयार केला आहे, जे गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे निर्माते आहेत. पंतप्रधान मोदी आज दुपारी ३:४५ वाजता मठ परिसरात दाखल होतील. ते मंदिराची प्रदक्षिणा करून दर्शन घेतील आणि त्यानंतर एका सार्वजनिक सभेला संबोधित करतील. या कार्यक्रमाला गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि राज्य मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे. आयोजकांच्या मते, हा अलिकडच्या काळातील मठातील सर्वात मोठा कार्यक्रम ठरणार आहे.

५५० व्या वर्धापन दिनानिमित्त “सारध पंचशतमनोत्सव”

पंतप्रधान मोदी श्री संस्थान गोकर्ण पर्तगळी जीवोत्तम मठाच्या ५५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “सारध पंचशतमनोत्सवा”साठी गोव्यात दाखल झाले आहेत. या प्रसंगी ते:

  • भगवान श्रीरामांच्या ७७ फूट कांस्य पुतळ्याचे अनावरण
  • रामायण थीम पार्क गार्डन”चे उद्घाटन
  • विशेष टपाल तिकीट प्रकाशन
  • एक स्मारक नाणे जारी
  • उपस्थित भाविकांना संबोधन

असे विविध कार्यक्रम साजरे करणार आहेत.

द्वैत परंपरेचा वारसा

श्री संस्थान गोकर्ण पर्तगळी जीवोत्तम मठ हा पहिला गौड सारस्वत ब्राह्मण वैष्णव मठ असून तो जगद्गुरू मध्वाचार्यांनी प्रस्थापित केलेल्या द्वैत पंथाचे अनुसरण करतो. कुशावती नदीकाठच्या पोर्तुगाली या प्राचीन शहरात असलेला हा मठ शतकानुशतके संस्कृतीचे केंद्र राहिला आहे. ७७ फूट पुतळा – पर्यटनासाठी नवे आकर्षण सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले की:

भगवान रामाचा हा पुतळा जगातील सर्वात उंच असणार असून तो गोव्यातील प्रमुख आध्यात्मिक आणि पर्यटन केंद्र बनेल.”

भव्य मूर्ती, थीम पार्क आणि नव्याने विकसित झालेले संकुल भविष्यात लाखो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करेल अशी अपेक्षा आहे.