सर्वोच्च न्यायालयात याचिका : भारत-पाकिस्तान टी-२० सामना रद्द करण्याची मागणी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी क्रिकेट सामन्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. १४ सप्टेंबर रोजी दुबईत होणारा टी-२० सामना रद्द करण्याची मागणी कायद्याच्या विद्यार्थ्यांनी उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली केली आहे.

 याचिकेची कारणमीमांसा

  • पहलगाम दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे हे राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि जनभावनांच्या विरुद्ध असल्याचे मत.
  • क्रिकेटला राष्ट्रीय हित, सैनिकांचे बलिदान किंवा नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्व देता येणार नाही.”
  • राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ च्या अंमलबजावणीसाठीही निर्देश मागितले.

याचिका कोणाकडून दाखल?

  • वकील स्नेहा राणी, अभिषेक वर्मा आणि मोहम्मद अनस चौधरी यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल.
  • सर्वोच्च न्यायालयाला सामन्यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती.

 सामन्यावर अनिश्चितता

  • भारत-पाक सामना आशिया चषकातील एक महत्त्वाचा टप्पा.
  • याचिकेतील राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांमुळे सामना होईल की नाही यावर शंका.
  • सुनावणी सामन्याच्या तारखेपूर्वी होण्याची शक्यता.

आशिया चषक २०२५: भारताची दमदार सुरूवात

  • भारताने पहिल्या सामन्यात युएईचा ९ विकेट्सने पराभव केला.
  • कुलदीप यादव – ७ धावांत ४ बळी.
  • शिवम दुबे – ४ बळी.
  • युएई ५७ धावांत सर्वबाद (१३.१ षटके).
  • भारताने लक्ष्य ४.३ षटकांत सहज गाठले.
  • अभिषेक शर्मा (३०), शुभमन गिल (२०*), सूर्यकुमार यादव (७*).