पी. एस. इंग्लिश मीडियमच्या आर्यनचे योगासन स्पर्धेत यश

सोलापूर :- श्राविका संस्था संचलित पी. एस.
इंग्लिश मीडियम जुनिअर कॉलेज मध्ये इयत्ता बारावी शिकणारा विद्यार्थी आर्यन
मोगलाली सांगे याने संगमनेर येथे घेण्यात आलेल्या सहाव्या महाराष्ट्र राज्यस्तरीय
योगासन स्पर्धेत लेग बॅलन्स प्रकारातून तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याला
प्रशिक्षक कल्याणप्पा हायगोंडे, रोहन घाडगे,
अजित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी
व मार्गदर्शक शिक्षकांचे श्राविका संस्थेचे अध्यक्ष यतीन शहा, विश्वस्त देवई शहा, मार्गदर्शिका दीप्ती शहा, प्राचार्य विलास लेंगरे व
सर्व प्राध्यापक वर्गाने अभिनंदन केले.