संगमेश्वर कॉलेजमध्ये ‘इंग्रजी भाषा व साहित्य संशोधन पद्धती’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

सोलापूर (प्रतिनिधी) — संगमेश्वर कॉलेज, सोलापूर (स्वायत्त) येथील इंग्रजी विभागाच्या वतीने "इंग्रजी भाषा आणि साहित्यातील संशोधन कार्यपद्धती" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आणि संशोधकांमध्ये संशोधनविषयक कौशल्ये विकसित करणे हा होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप प्राचार्य डॉ. सुहास पुजारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डी. एम. मेत्री (माजी विभागप्रमुख व उपप्राचार्य, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर) उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून प्रा. डॉ. ऍनी जॉन (विभागप्रमुख, इंग्रजी विभाग, ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालय, सोलापूर) आणि प्रा. डॉ. सदाशिव माने (सहप्राध्यापक, इंग्रजी विभाग, श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी) यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून इंग्रजी संशोधन पद्धतींच्या विविध अंगांचा सखोल आढावा सहभागी संशोधक विद्यार्थ्यांना मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैभवी सुद्धाळकर यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. मस्के यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. हल्लोळी आणि पहिल्या सत्राच्या संसाधन व्यक्तीचे परिचय डॉ. जावळे यांनी करून दिला.  उदघाटन आणि पहिल्या सत्राचे आभार प्रदर्शन प्रा. शिंदे आणि प्रा. अष्टे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. ऋतुराज बुवा (कार्यकारी प्राचार्य), संयोजक डॉ. मकानदार व डॉ. पाटील होते. स्थानिक आयोजन समितीत प्रा. चिकटे, डॉ. जावळे, प्रा.  शेळगे, प्रा. नारा, प्रा. शिंदे, प्रा.आष्टे, तसेच संशोधक विद्यार्थीनी कु. स्वाती पाटील व कु. स्नेहल लेंगरे यांचा समावेश होता. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, इंग्रजी विषयातील संशोधन प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण माहिती व मार्गदर्शन या निमित्ताने मिळाले. कार्यशाळा समारोप सत्रात सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख डॉ. बी. एस. पाटील यांनी करून दिली, तर प्रमुख पाहुणे डॉ. ऍनी जॉन होत्या. कार्यशाळेचा समारोप डॉ. मकानदार यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.