रेल्वेची नवी ऑफर: राउंड ट्रिप पॅकेजमध्ये परतीच्या प्रवासावर २०% सूट

भारतीय रेल्वेने सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा
देत ‘राउंड ट्रिप पॅकेज’ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, निर्धारित वेळेत परतीचा प्रवास बुक करणाऱ्या प्रवाशांना रिटर्न
तिकिटाच्या मूळ भाड्यावर २०% सूट मिळणार आहे. |
रेल्वे प्रशासनानुसार, ही योजना १४ ऑगस्ट २०२५ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे.
पहिल्या प्रवासाचे (Onward Journey) तिकीट १३ ऑक्टोबर २०२५
ते २६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत बुक करावे लागेल. त्यानंतर परतीच्या प्रवासासाठी
(Return Journey) तिकीट १७ नोव्हेंबर २०२५ ते १ डिसेंबर
२०२५ या कालावधीत ‘कनेक्टिंग जर्नी फीचर’ द्वारे बुक करता
येईल. |
रेल्वेने स्पष्ट केले आहे की, सवलत फक्त तेव्हाच मिळेल जेव्हा दोन्ही प्रवासांची तिकिटे कन्फर्म असतील
आणि ती एकाच प्रवाशांच्या नावावर असतील. या योजनेत परतीच्या तिकिटासाठी आगाऊ
आरक्षण कालावधी लागू होणार नाही. |
रेल्वेचे म्हणणे आहे की, या उपक्रमाचा उद्देश सणांच्या काळात गर्दीचे नियोजन व प्रवाशांना उत्तम
सुविधा देणे आहे. योजना यशस्वी ठरल्यास ती पुढे नियमित स्वरूपात लागू होण्याची
शक्यता आहे. |