भारत-पाकिस्तान फाळणीवर एनसीआरटीचा नवा अभ्यासक्रम; जिन्ना, नेहरू आणि माऊंटबॅटन जबाबदार असल्याचा उल्लेख

नवी दिल्ली : एनसीआरटीने 1947 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीबद्दल नवा अभ्यासक्रम तयार केला आहे. सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा दोन मॉड्युलमध्ये या घटनांचा समावेश करण्यात आला आहे. यात फाळणीच्या मागील कारणांचा आणि नेत्यांच्या भूमिकांचा तपशीलवार उल्लेख आहे. कोण जबाबदार होते फाळणीसाठी? एनसीआरटीच्या मते, भारताची फाळणी ही कोणत्याही एका व्यक्तीमुळे झालेली नाही. तीन महत्त्वाचे घटक यासाठी जबाबदार ठरवले गेले आहेत –
- मोहम्मद अली जिन्ना (वेगळ्या पाकिस्तानची मागणी),
- काँग्रेस व नेहरू (फाळणी स्वीकारणे),
- लॉर्ड माऊंटबॅटन (फाळणी लागू करणे).
फाळणीबद्दलचे वेगवेगळे दृष्टिकोन
- सरदार वल्लभभाई पटेल : सुरुवातीला विरोधात असले तरी
त्यांनी फाळणीला "अनिवार्य औषध" मानून स्वीकारले.
- लॉर्ड माऊंटबॅटन : “फाळणी माझी नव्हे, भारतीय नेत्यांची मंजुरी होती. मी ती फक्त शांततेत लागू केली.
हिंसाचाराची जबाबदारी भारतीयांची होती,” असे त्यांनी
म्हटले.
- महात्मा गांधी : त्यांनी सुरुवातीला फाळणीला विरोध
केला होता, परंतु गृहयुद्धाची शक्यता लक्षात घेऊन
अखेरीस मान्यता दिली.
काँग्रेसची टीका काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी या अभ्यासक्रमावर
टीका केली आहे. “एनसीआरटीने पूर्ण सत्य सांगितलेले नाही. फक्त काँग्रेस आणि
जिन्नांना जबाबदार धरणे हे अर्धसत्य आहे,” असे ते म्हणाले.