मुंबई–कोकण रो-रो सेवा : विजयदुर्गपर्यंत बोटीची पहिली यशस्वी चाचणी

मुंबई : कोकणात जाणाऱ्यांसाठी आता सागरी प्रवासाची नवी सोय उपलब्ध होणार आहे. एम 2 एम प्रिन्सेस’ या रो-रो बोटीची मुंबई–विजयदुर्ग मार्गावरील चाचणी यशस्वी झाली आहे.

ही सेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचे नियोजन होते; मात्र तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला. अखेर आज या बोटीने मुंबईहून जयगड बंदर मार्गे विजयदुर्ग गाठत चाचणी पूर्ण केली.

🚢 प्रवासाचा फायदा

  • रस्त्याने १०–१२ तास लागणारा प्रवास आता केवळ ३ ते ५ तासांत पूर्ण होणार.
  • मुंबई ते रत्नागिरी : ३ तास
  • मुंबई ते सिंधुदुर्ग : ५ तास
  • २५ नॉट्सच्या वेगाने धावणाऱ्या या बोटीमुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर वेळ वाचणार.

तिकिट व भाडेप्रणाली

  • प्रवासी तिकिटे : ,५०० (इकॉनॉमी क्लास) ते ,००० पर्यंत
  • वाहन भाडे :
    • कार – ,०००
    • दुचाकी – ,०००
    • सायकल – ६००

एका प्रवासात बोटीत

  • ६५६ प्रवासी
  • ५० कार, ३० दुचाकी आणि मिनी-बस वाहून नेण्याची क्षमता आहे.

 

नितेश राणे यांचे विधान

विजयदुर्ग बंदरात पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. हवामान अनुकूल राहिल्यास आणि सर्व तपासण्या समाधानकारक झाल्यानंतर ही सेवा कायमस्वरूपी सुरू करण्यात येईल. परतीच्या प्रवासात बोटीने चाकरमान्यांना थेट मुंबई गाठणे सोपे होईल,” असे मत्स्यव्यवसाय बंदर मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.