सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मागणीसाठी आंदोलन, शहरात २५ ठिकाणी रांगोळी काढून लक्ष वेधलं
विजयपूर : सरकारी वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुरू असलेले आंदोलन आज
६२व्या दिवशी पदार्पण केले. या संघर्षाला
कर्नाटक जनआरोग्य चळवळ यांनी आज रांगोळी आंदोलन आयोजित करून पूर्ण समर्थन
दिले.विजयपूरमध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे,खासगी भागीदारी मागे घ्यावी,सरकारी रुग्णालय वाचवावे
या मागण्यांना प्राधान्य देत विजयपूर शहरातील २५ पेक्षा जास्त ठिकाणी रांगोळी
काढून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध गावांमधून आलेल्या
स्वयंसहाय्य समूहांच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रांगोळी काढून
सरकारविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली.
जनआरोग्य चळवळीचे अखिल कार्यक्रमात बोलताना म्हणाले: सरकारी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन
करण्यासाठी विविध प्रकारच्या आंदोलनांचे आयोजन करण्यात आले आहे. रांगोळी आंदोलन हे
त्याचाच एक भाग आहे.सरकार हा प्रकल्प खासगी संस्थांना देऊ पाहत असल्यास, उद्या आपल्या जिल्हा सरकारी रुग्णालयालाही खासगीकरणाचा धोका निर्माण
होईल.विजयपूर हा १५० एकर जमिनीचा मालक असलेला एकमेव जिल्हा हास्पीटल असून येथे
सर्व सुविधा व भूजागा उपलब्ध आहे. ही जमीन कोणत्याही परिस्थितीत खासगी संस्थांना
विकू देणार नाही.पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन उभारण्याची गरज आहे.कॉर्पोरेट
घराण्यांना मदत करताना आपल्या जिल्ह्याशी केलेल्या विश्वासघाताचा तीव्र निषेध करतो,
असे त्यांनी स्पष्ट केले. मोठ्या प्रमाणात सहभाग या रांगोळी
आंदोलनात विविध गावांतील महिला, मुली आणि हक्काची मागणी
करणाऱ्या नागरिकांनी सहभाग घेतला.सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आंदोलन समितीचे सर्व
सदस्य उपस्थित होते.