लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांना घाबरू नये, सतर्क राहण्याचे आवाहन

लातूर | २४ सप्टेंबर २०२५
मुसळधार पावसाने आधीच संकट ओढवलेल्या मराठवाड्यात आता भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी, बडूर व उस्तुरी गावात बुधवारी रात्री ९:३० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. 
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, नवी दिल्ली यांनी याची पुष्टी केली असून, धक्क्याची तीव्रता २.४ रिश्टर स्केल इतकी नोंदवली आहे. मंगळवारीदेखील धक्का यापूर्वी, मंगळवारी रात्री ८:१३ वाजता मुरुड अकोला परिसरातही २.३ रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप झाला होता. त्यामुळे सलग दोन दिवस लातूर जिल्ह्यात भूकंप जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाचे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, धक्का सौम्य आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे.” भूकंपाची पार्श्वभूमी ३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे प्रलयंकारी भूकंप झाला होता. त्यानंतर लातूर, औसा आणि निलंगा तालुक्यात वेळोवेळी सौम्य धक्क्यांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिकांच्या मनात आजही भीती कायम आहे.

 हायलाइट्स

  • लातूरमध्ये २.४ रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप
  • मंगळवारीही २.३ रिश्टर स्केलचा धक्का
  • सलग दोन दिवस हादरला लातूर
  • नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
  • १९९३ च्या किल्लारी भूकंपाची आठवण ताजी