सोलापूरात वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षातील साक्षी मैलापुरेने घेतले टोकाचे पाऊल
सोलापूर :- सोलापूर शहरात वैद्यकीय क्षेत्राला
हादरवणारी घटना घडली आहे. एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या २५ वर्षीय
साक्षी सुरेश मैलापुरे हिने अज्ञात कारणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. या
घटनेने सोलापूर वैद्यकीय विद्यार्थी वर्तुळात शोककळा पसरली आहे.
ही घटना जुळे सोलापूर येथील आयएमएस शाळेसमोर मंगळवारी
दुपारी १२ वाजता उघडकीस आली.
घटनेचा क्रम
मंगळवारी सकाळी साक्षी अभ्यासासाठी खोलीत गेली होती. बराच वेळ झाला
तरी ती बाहेर आली नाही.
आईने अनेकदा दरवाजा ठोठावला, पण प्रतिसाद न
आल्याने संशय आला.
मोबाईलवर कॉल केल्यावरही प्रतिसाद न मिळाल्याने आईने शेजाऱ्यांच्या
मदतीने दरवाजा तोडला.दरवाजा उघडताच साक्षी गळफास घेतलेल्या अवस्थेत छताच्या
पंख्याला लटकलेली दिसली.आईने तिला तत्काळ खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केले,
मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
शाळा आणि प्रशासनाची धावपळ
साक्षी सोलापुरातील वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या
तिसऱ्या वर्षात शिकत होती.
घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर आणि उपअधिष्ठाता
डॉ. नरेश जंजाळ यांनी रुग्णालयात धाव घेतली
आणि साक्षीच्या आई-वडिलांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले.
साक्षीचे वडील वीज वितरण विभागात कार्यरत, तर तिच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे.
आईची
हृदयद्रावक अवस्था
मुलीचा मृतदेह पाहताच साक्षीची आई कोसळली.
तिच्या डोक्यात गंभीर जखम झाली, आणि ती
रक्तबंबाळ अवस्थेतही
“साक्षी... साक्षी... उठ ना!” असे ओरडत
राहिली.
डॉक्टरांनी तिला समजावून सांगितले आणि उपचारासाठी दाखल केले.
पोलिस तपास सुरू
साक्षीने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप
स्पष्ट झालेले नाही.
घरात कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही.
सोलापूर पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.