हाँगकाँगमध्ये भीषण आग: 44 जणांचा मृत्यू, 300 हून अधिक बेपत्ता; 7 इमारती भक्ष्यस्थानी

हाँगकाँगच्या ताई पो जिल्ह्यातील वांग फुक कोर्ट येथे सोमवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. अचानक लागलेल्या आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले आणि परिसरातील सात इमारतींना वेढा घातला. अग्निशमन विभागाने अनेक तासांच्या प्रयत्नांनंतरही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणता आली नाही. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, 44 जणांचा मृत्यू सत्यापित झाला आहे, तर 300 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अनेक नागरिक गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ८ टॉवर ब्लॉक, ,९८४ फ्लॅट्स — आणि नूतनीकरणातील मचान वांग फुक कोर्टमध्ये ३१ मजली असे ८ ब्लॉक असून एकूण १,९८४ अपार्टमेंट आहेत. अलीकडेच या टॉवर्सचे नूतनीकरण सुरू होते आणि प्रत्येक इमारतीला बाहेरून बांबूचे मचान बसवले होते.

प्राथमिक तपासानुसार—

  • आग एका इमारतीतून दुसरीकडे बांबू कोरडा असल्यामुळे अतिशय वेगाने पसरली
  • तापमान अत्यंत जास्त असल्याने जळणारे तुकडे उडून दूरवर पडत होते
  • त्यामुळे इतर इमारतींमध्येही आग लागली

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ

घटनास्थळावरील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यात—

  • प्रचंड ज्वाळा
  • धुराचे ढग
  • दहा-दहा अग्निशमन गाड्या
  • रहिवाशांचा ओरडण्याचा आवाज

हे स्पष्ट दिसत आहे.

9०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

बचावकार्यादरम्यान सुमारे 900 रहिवाशांना तात्पुरत्या निर्वासन केंद्रात हलवण्यात आले आहे.

आगीचे दर्जा–5 वर्गीकरण

हाँगकाँगमध्ये आग प्रकरणांची वर्गवारी 1 ते 5 असे असते. यातील लेव्हल 5 हा दुसरा सर्वात गंभीर स्तर मानला जातो. 2008 मध्ये लागलेल्या लेव्हल 5 आगीत 4 जणांचा मृत्यू झाला होता.
1962 मधील एका भीषण आगीतही 44 जणांचा मृत्यू झाला होता.

3 संशयितांना अटक

या आगीच्या पार्श्वभूमीवर 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले. मात्र आग लावण्यात आली की अपघाताने लागली याबाबतचा निर्णय तपासानंतरच कळणार आहे.