पुण्यात नरवीर तानाजी वाडी परिसरात पीएमपी बसला भीषण आग – बस जळून खाक

पुण्यातील नरवीर तानाजी वाडी येथे उभी असलेल्या पीएमपीएमएल बसला आज पहाटे साडेचार वाजता अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच कसबा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

तोपर्यंत बसच्या दर्शनी भागासह काच, बाकडे आणि वायरिंग जळून खाक झाले होते. कसबा येथील अग्निशमन दलाने केवळ १५-२० मिनिटांत आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, या घटनेत बस क्रमांक MH 12 PQ 3137 चे मोठे नुकसान झाले आहे.

आग विझविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्यांमध्ये:

  • कमलेश चौधरीप्रभारी अधिकारी
  • नितीन सुर्यवंशीचालक
  • हरिश बुंदिलेफायरमन
  • प्रतिक कुंभारफायरमन
  • सुमित खरात, सनी लोखंडे, दत्ता खांडरेमदतनीस

त्यांच्या तत्परतेमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली नाही आणि परिसरात अन्य नुकसान टळले.