ऑक्सिजन प्लांटमध्ये भीषण स्फोट; २ ठार, ३ जखमी

पंजाबच्या मोहाली जिल्ह्यात आज सकाळी फेज-९ औद्योगिक परिसरातील एका ऑक्सिजन प्लांटमध्ये मोठा सिलिंडर स्फोट झाला. या भीषण अपघातात २ कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांची नावे देवेंद्र आणि आसिफ अशी असून, जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची कारणमीमांसा स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्फोट सिलिंडरमध्ये जास्त दाबामुळे झाला. सिलिंडर भरताना सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाल्याचा प्राथमिक संशय आहे. स्फोट इतका जोरदार होता की आसपासच्या इमारतींच्या काचा फुटल्या आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. संतप्त जमावाचा कारखाना प्रशासनावर आरोप या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी कारखान्याबाहेर गोंधळ घालून संताप व्यक्त केला. काही ठिकाणी पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापट झाल्याचीही माहिती आहे. लोकांचा आरोप आहे की, कारखाना प्रशासनाने यापूर्वीही अपघाताच्या शक्यतेबाबत केलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. प्रशासनाची तातडीची कारवाई पोलिस, अग्निशमन विभाग आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून राहत आणि बचावकार्य सुरू आहे. सध्या फॉरेन्सिक टीम आणि सुरक्षा तपास पथक अपघाताचे नेमके कारण शोधत आहेत.