मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मुंबई
पोलिसांनी दिलेल्या आझाद मैदान रिकामे करण्याच्या नोटिशीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांना इशारा दिला आहे.
"हैदराबाद गॅझेटिअर आणि सातारा संस्थान गॅझेटिअरच्या
अंमलबजावणीसह सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही,"
असे ठाम विधान जरांगेंनी केले. आज आझाद मैदानावरील उपोषणाचा पाचवा दिवस असून, जरांगेंनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की आंदोलन नियम पाळून शांततेत सुरू
राहील, मात्र तोडगा लागेपर्यंत सुरूच राहील. जरांगेंच्या प्रमुख मागण्या
- हैदराबाद व सातारा
गॅझेटिअरची अंमलबजावणी
- सरसकट राज्यातील
केसेस मागे घेणे
- आंदोलकांवर हल्ला
करणाऱ्या पोलिसांवर कारवाई
- बलिदान दिलेल्या
कुटुंबांना तातडीने मदत व नोकरी
- प्रत्येक
ग्रामपंचायतीत कुणबी नोंदी चिटकवून प्रमाणपत्र वाटप
- शिंदे समितीला
स्वतंत्र कार्यालय व दस्तऐवज शोधण्याचे अधिकार
जरांगे म्हणाले,
"आम्हाला सरकार कितीही घाबरवायचा प्रयत्न करेल, तरी आम्ही भीत नाही. आम्ही तुरुंगात नेलं तरी तिथेच उपोषण सुरू ठेवू.
मराठ्यांना आझाद मैदानातून हुसकावून दिलं, तर तो वार
सरकारलाच महागात पडेल." शनिवारी-रविवारी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव मुंबईत दाखल
होऊ शकतात, असेही जरांगेंनी सूचित केले.