मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तीव्रतेकडे; सरकारकडून चर्चेला वेळ, पण तोडगा नाही

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील
यांच्या बेमुदत उपोषणाचा आज तिसरा दिवस असून, त्यांच्या मागण्यांवर सरकार पातळीवर
बैठकींना जोर मिळाला आहे. मात्र, सरकारकडून जरांगे यांच्याशी
थेट चर्चा झालेली नाही. त्यामुळे ‘बैठकांना जोर, चर्चेला
मात्र ब्रेक’ असे चित्र दिसले.
🔹 आता पाणीही पिणार नाही – जरांगे
सरकारच्या चर्चेच्या घोळामुळे आपण आता उपोषण आणखी तीव्र करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. "तीन दिवस पाणी घेत होतो. मात्र सोमवारपासून पाणीही बंद करून कडक उपोषण करणार," असा इशारा त्यांनी दिला.
🔹 सरकारची हालचाल
- मंत्रिमंडळ
उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, "लवकरच आम्ही त्यांच्याकडे
अंतिम प्रस्ताव घेऊन जाऊ."
- यामुळे रविवारी
चर्चेला ब्रेक लागला असला तरी, दारे
अद्याप उघडी असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
- उपसमितीचे सदस्य, महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा
निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.
🔹 सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव
रविवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानात
मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र निघताना आंदोलकांनी त्यांना घेराव घातला
आणि त्यांच्या वाहनावर बाटल्या फेकल्या.