महात्मा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत मोठा बदल; २,३९९ आजारांवर उपचार उपलब्ध, अवयव प्रत्यारोपणासाठी स्वतंत्र कॉर्पस निधी

मुंबई | १६ सप्टेंबर २०२५
केंद्र सरकारची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा
जोतिराव फुले जनआरोग्य योजना यामधील उपचारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात
आली आहे. आतापर्यंत १,३५६ उपचार उपलब्ध होते, मात्र आता ती संख्या २,३९९ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या
नियामक परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस अन्न व नागरी
पुरवठामंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट,
राज्यमंत्री माधुरी मिसाळ, तर आरोग्यमंत्री
प्रकाश आबिटकर आणि महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे ऑनलाईन उपस्थित होते.
प्रमुख निर्णय
- योजनेंतर्गत आता २,३९९ आजारांवर उपचार उपलब्ध
- प्राथमिक आरोग्य
केंद्रांवर २५ आजारांवरील उपचारांना मान्यता
- सर्व ग्रामीण व शहरी
प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश
- उपचारांच्या दरनिश्चितीला
मंजुरी
- रुग्णालयांना
श्रेणीनुसार दर देण्याची पद्धत बंद
- गुणवत्ता प्रमाणपत्र
असलेल्या व आकांक्षित जिल्ह्यांतील रुग्णालयांना प्रोत्साहनपर अतिरिक्त रक्कम
अवयव प्रत्यारोपणासाठी स्वतंत्र निधी
५ लाखांपेक्षा अधिक खर्चाच्या उपचारांसाठी स्वतंत्र कॉर्पस
फंड उभारण्यास मान्यता देण्यात आली. या निधीतून हृदय, फुप्फुस, किडनी, बोन मॅरो
प्रत्यारोपणासह ९ महत्त्वाचे उपचार रुग्णांना उपलब्ध करून दिले जातील.