बंगळुरूमध्ये प्रेमत्रिकोणातून खून; लंगोटी मित्रावरच हत्येचा आरोप

बंगळुरू – कर्नाटकच्या राजधानीत प्रेमसंबंधातून मित्राचा खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार नावाच्या रिअल इस्टेट एजंटचा मृतदेह त्याच्या भाड्याच्या घरात सापडला. त्याच्या हत्येचा आरोप त्याचाच बालपणापासूनचा मित्र धनंजय याच्यावर आहे. विजयकुमारने दहा वर्षांपूर्वी आशा नावाच्या तरुणीसोबत लग्न केले होते. तपासात पोलिसांना विजयच्या पत्नी आशा आणि धनंजय यांच्यातील प्रेमसंबंधाचा सुगावा लागला. विजयने त्यांना रंगेहाथ पकडल्यानंतरही पत्नीला सुधारण्यासाठी संधी दिली होती आणि धनंजयपासून दूर राहण्यासाठी घरही बदलले होते. तथापि, अलीकडेच विजयचा मृतदेह नवीन घरात सापडला. पोलिसांनी आशाला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. तर धनंजय फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.