८ तासांची शिफ्ट संपवून आई घरी परतली; लहान मुलाची भावनिक प्रतिक्रिया पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२५
आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते, तिचं प्रेम शब्दांत व्यक्त करणं जवळजवळ अशक्य असतं. आई ऑफिसमध्ये काम करत असली तरी तिचं मन नेहमी आपल्या बाळाकडेच असतं — त्यानं नीट खाल्लं का, खेळत असेल का, माझी आठवण येतेय का — हेच विचार तिच्या मनात चालू असतात. अशाच एका आई-मुलाच्या प्रेमळ क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वर्किंग आई आपली ८ तासांची शिफ्ट पूर्ण करून घरी येते, आणि तिचं बाळ तिच्या दर्शनानं भावनांनी ओथंबून जातं. आईला पाहून लहान मूल आधी रडू लागते, थोडं रागावलेल्यासारखं तोंड फिरवतं, पण जेव्हा आई त्याला प्रेमानं हाक मारते, तेव्हा ते लगेच तिच्या कुशीत जाऊन मिठी मारतं. आईच्या मिठीत गेल्यावर त्या मुलाचं सगळं रडणं शांत होतं. हा व्हिडिओ @shiwaniofficial_ या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर आतापर्यंत ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, नेटकरी या व्हिडिओवर भावनिक कमेंट्स करत आहेत.

एका युजरने लिहिलं — आपल्या बाळापासून दूर राहणं ही जगातील सर्वात कठीण गोष्ट आहे.”
तर दुसऱ्या युजरने म्हटलं — मुलाचा चेहरा पाहून माझ्याही डोळ्यांत अश्रू आले.”
अनेकांनी आई-मुलाच्या या नात्याला “जगातील सर्वात सुंदर भावना” असे संबोधले आहे.