करवा चौथ फसवणूक: १२ नववधूंनी सासरच्या मंडळींना विषारी जेवण देऊन लाखो रुपयांसह पळ काढला; अलीगढ हादरलं

अलीगढ (उत्तर प्रदेश)करवा चौथच्या शुभ रात्री एक अशी थरकाप उडवणारी घटना घडली, ज्याने संपूर्ण प्रदेश हादरवून सोडला.
अलीगढच्या सासनी गेट पोलीस स्टेशन क्षेत्रात तब्बल १२ नववधूंनी आपल्या सासरच्या मंडळींना विषारी पदार्थ देऊन लाखो रुपयांची लूट केली आणि फरार झाल्या.

लग्नाच्या नावाखाली फसवणूक

या सर्व नववधू बिहार आणि झारखंडमधून आणल्या गेल्या होत्या. दलालांनी या महिलांचे लग्न स्थानिक अविवाहित तरुणांशी लावून दिले होते. या लग्नासाठी ८०,००० ते १.५ लाख रुपये इतकी रक्कम दलालांना देण्यात आली होती. पोलिसांनी प्राथमिक तपासात उघड केलं आहे की ही एक संघटित टोळी असून त्यांनी “लग्न – विश्वास – विष” असा संपूर्ण फसवणुकीचा प्लॅन आखला होता.

 प्रथम विश्वास, मग विष

कुटुंबीयांच्या मते, या नववधूंनी लग्नानंतर सासू-सासऱ्यांची मनं जिंकण्यासाठी खूप गोड वागणूक दिली.
करवा चौथच्या दिवशी त्यांनी घर सजवलं, मेंदी लावली, नवऱ्यांसाठी व्रत केलं आणि आरती केली.

रात्रीच्या जेवणात सर्वांनी स्वतःहून स्वयंपाक केला आणि त्या जेवणातच विषारी पदार्थ मिसळला.
संपूर्ण कुटुंब बेशुद्ध पडताच, नववधूंनी दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढला.

सकाळी जेव्हा शुद्ध आली…

सकाळी जेव्हा कुटुंबीयांना शुद्ध आली, तेव्हा कपाट उघडं आणि लॉकर रिकामं दिसलं.
महिला घरातून बेपत्ता होत्या.
घाबरलेल्या कुटुंबीयांनी दलालांना कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण सर्व नंबर स्विच ऑफ होते.

३० लाखांहून अधिकांची फसवणूक

पोलिस तपासानुसार, या १२ वधूंनी मिळून सुमारे ३० लाख रुपयांची लूट केली आहे.
यामध्ये रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने आणि महागडे मोबाईल समाविष्ट आहेत.

सध्या चार एफआयआर दाखल झाले असून पोलीस बिहार आणि झारखंडमधील टोळीचा शोध घेत आहेत.

पोलीसांचा अंदाज — “फसवणूक करणारी टोळी सक्रिय”

अलीगढ पोलिसांनी सांगितले कीही महिलांची टोळी संघटित पद्धतीने ग्रामीण भागात लग्नं लावून फसवणूक करत आहे. दलालांच्या माध्यमातून ही नेटवर्क पसरलेली आहे.”

स्थानिकांमध्ये भीती आणि संताप

या घटनेनंतर अलीगढ आणि आसपासच्या गावांमध्ये संताप आणि अविश्वासाचे वातावरण आहे.
लोकांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, “लग्नात प्रेम नाही, तर फसवणूक सुरू झाली आहे.”