‘झुंड’ चित्रपटातील अभिनेता बाबू छत्रीच्या हत्येचे गूढ उकलले; आरोपीची धक्कादायक कबुली

नागपूर | 2 ऑक्टोबर २०२५झुंड’ (Jhund) या बहुचर्चित हिंदी चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेता बाबू छत्री उर्फ प्रियांशुच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ध्रुव उर्फ दृप शाहू (वय २०, रा. नारा) या आरोपीने धक्कादायक कबुली दिली आहे. त्याने सांगितले की, बाबू छत्रीने मला २४ तासांत संपवण्याची धमकी दिली होती. म्हणून मी त्याचा काटा काढला.” जरीपटका पोलिसांनी ध्रुव शाहूला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, ध्रुव शाहू हा आधीपासूनच कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर पाच गंभीर गुन्हे नोंद आहेत. मृत बाबू छत्री उर्फ प्रियांशु देखील परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये तीव्र वाद आणि तणाव सुरू होता. या वादातूनच बाबू छत्रीने ध्रुवला थेट २४ तासांत ठार मारीन” अशी धमकी दिली होती. या धमकीमुळे ध्रुव भीतीत होता आणि त्यानेच आधी कारवाई करत बाबू छत्रीचा खून केला,
असे तपासात उघड झाले आहे. पोलिस तपासात हे स्पष्ट झाले आहे की, या हत्येमागे सूडभावना आणि जीवे मारण्याच्या भीतीतून निर्माण झालेला ताण हेच मुख्य कारण होते.
जरीपटका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.