जामनेर निवडणुकीत गिरीश महाजनांची धडक खेळी; शिंदेसेनेचे २ उमेदवार अर्ज मागे घेत भाजपात
जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत
महायुतीत असलेल्या शिंदेसेना–भाजप या दोन घटकांमध्येच रस्सीखेच सुरू असल्याचे
वारंवार दिसत आहे. जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीतही असाच नाट्यमय कलाटणी देणारा
प्रसंग घडला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे नेते आणि संकटमोचक म्हणून ओळखले
जाणारे गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा धक्का देत शिंदेसेनेचे
दोन उमेदवार स्वतःच मागे हटवून भाजपात प्रवेश करवला. या हालचालीमुळे भाजपाचे
दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
कोण
होते आमने-सामने?
जामनेर नगरपालिकेत शिंदेसेना आणि भाजप आमनेसामने होते.
शिंदेसेना उमेदवार:
- वार्ड १ — मयुरी
चव्हाण
- वार्ड १३ — रेशंता
सोनवणे
भाजप उमेदवार:
- वार्ड १ — सपना
झाल्टे
- वार्ड १३ — किलुबाई
शेवाळे
दोन्ही पक्षांनी समोरासमोर उमेदवारी दिल्याने चुरस वाढली
होती. मात्र, निवडणुकीच्या अगदी शेवटच्या क्षणी गिरीश
महाजनांनी केलेल्या चर्चेतून शिंदेसेनेचे दोन्ही उमेदवार अर्ज मागे घेत भाजपात
दाखल झाले. यावेळी शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख अतुल सोनवणे देखील भाजपात दाखल
झाले. माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
यामुळे:
- सपना झाल्टे — बिनविरोध विजयी
- किलुबाई शेवाळे — बिनविरोध विजयी
भाजपाला दोन जागा सहज मिळाल्या.