सोलापूर भाजपात अंतर्गत कलह – पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे एकत्रित राजीनामे

सोलापूर | १3 सप्टेंबर २०२५
सोलापूर भाजपात पुन्हा एकदा नाराजीनाट्य उफाळून आले आहे. शहर
उपाध्यक्ष अनंत जाधव यांच्या राजीनाम्यानंतर चिटणीस श्रीकांत घाडगे यांनीही
शुक्रवारी पद सोडले. त्याचवेळी, धनगर समाजातील ५० हून
अधिक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा
दिल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
🔹 राजीनाम्यांची मालिका
- १० सप्टेंबर : शहर कार्यकारिणी जाहीर होताच अनंत
जाधव यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- १२ सप्टेंबर : चिटणीस श्रीकांत घाडगे यांनीही
पदाचा राजीनामा दिला.
- त्याच दिवशी धनगर
समाजातील कार्यकर्त्यांची बैठक होऊन ५० जणांनी सदस्यत्व सोडले.
🔹 कार्यकर्त्यांचा आरोप
- नव्या कार्यकारिणीत धनगर
समाजाला स्थान न दिल्याने नाराजी.
- समाजावर अन्याय
झाल्याचा आरोप.
- जयकुमार गोरे यांना भेटून निवेदन सादर.
- "आणखी जुने कार्यकर्तेही पक्ष सोडतील," असा
इशारा राम वाकसे व राज बंडगर यांनी दिला.
🔹 भाजपातील अंतर्गत संघर्ष
- महापालिका
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात अंतर्गत गटबाजी उफाळली आहे.
- आ. विजयकुमार देशमुख
विरुद्ध सचिन कल्याणशेट्टी-देवेंद्र कोठे गट यांच्यात संघर्ष.
- पालकमंत्री जयकुमार
गोरे यांनी शुक्रवारी आ. विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन एकात्मतेचा
संदेश दिला.