इंडिगोचे देशभरात उड्डाणे ठप्प; तीन दिवसांत ६०० हून अधिक फ्लाइट्स रद्द
भारताची सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोला
सलग तिसऱ्या दिवशीही गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरता
आणि ऑपरेशनल समस्यांमुळे एअरलाइनचे देशभरातील वेळापत्रक कोलमडले असून, आज दिल्लीमध्ये ३० पेक्षा जास्त, मुंबईत
८५, तर हैदराबादमध्ये ३३ उड्डाणे रद्द करण्यात
आली.
गेल्या तीन दिवसांत ६०० हून अधिक फ्लाइट्स प्रभावित झाल्या
आहेत.
पायलट–केबिन क्रू कमी, ऑपरेशनल गोंधळ
इंडिगोमध्ये पायलट आणि केबिन क्रू यांच्या अचानक
गैरहजेरीमुळे व FDTL (Flight Duty Time Limitation) नियमांमुळे
ड्युटी रोस्टरमध्ये अडथळे निर्माण झाले.
यामुळे दिल्ली, मुंबई, बेंगळुरू,
कोलकाता यांसारख्या मोठ्या विमानतळांवर प्रवाशांची झुंबड, गोंधळ, तिकीट बदल व परतफेडीची समस्या वाढली.
कंपनीकडे उपलब्ध असलेल्या ‘तयार वैमानिकां’च्या
कमतरतेमुळे हंगामी गर्दीच्या काळात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
DGCA ची कठोर कारवाई – इंडिगोला नोटीस
या मोठ्या ऑपरेशनल अपयशानंतर DGCA ने इंडिगोला स्पष्टीकरण मागणारी नोटीस बजावली आहे.
– इतक्या मोठ्या प्रमाणात फ्लाइट्स रद्द का?
– प्रवाशांना दिलासासाठी कोणती पावले?
– भरपाईची योजना काय?
DGCA ने स्पष्ट केले की प्रवाशांना
झालेल्या गैरसोयीबाबत जबाबदारी एअरलाइनचीच राहील.
इंडिगो दररोज साधारण २,३०० उड्डाणे चालवते, त्यामुळे या अडचणींचा राष्ट्रीय विमान
वाहतूक वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे.
इंडिगोचे स्पष्टीकरण
एअरलाइनने निवेदनात सांगितले की—
– तांत्रिक बिघाड
– हिवाळ्यातील वेळापत्रक बदल
– प्रतिकूल हवामान
– मंदावलेली हवाई वाहतूक
– क्रू शिफ्ट चार्टबाबतचे नवीन नियम