IndiGo चं संकट कायम; ८२७ कोटींचे रिफंड जारी, सरकारकडून कडक कारवाईची तयारी
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोचं संकट अद्याप
संपत नाहीये. मोठ्या प्रमाणावर फ्लाइट रद्द झाल्यानंतर त्रस्त प्रवाशांसाठी
कंपनीने आतापर्यंत ८२७ कोटी रुपयांचे रिफंड केले आहेत. ही प्रक्रिया अजूनही सुरू
असून, अनेक प्रवाशांना अजूनही रिफंड मिळालेला नाही. ३ ते १५ डिसेंबरदरम्यान रद्द
फ्लाइट्सचे रिफंड कंपनीनुसार, ३–१५ डिसेंबरदरम्यान रद्द
झालेल्या उड्डाणांसाठी रिफंड प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत:
- ₹827 कोटी
रक्कम परत
- 4,500 हून अधिक हरवलेल्या बॅगा प्रवाशांकडे सुपूर्द
यासह बाकी रिफंडही प्रक्रियेत आहे. उड्डाणे हळूहळू
सामान्य शेकडो फ्लाइट्स रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. परंतु आता संचालन
स्थिर होत आहे:
- शनिवार — 1,565 उड्डाणे
- रविवार — 1,650 उड्डाणे
- सोमवार — 1,800+ उड्डाणे
कंपनी सध्या दररोज २ लाखांहून अधिक ग्राहकांना सपोर्ट
सेवा देत असल्याचे सांगते.
रिफंड स्टेटस कसे तपासावे?
goindigo.in/refund.html
वर जा
PNR / बुकिंग माहिती व ईमेल
आयडी भरा
Check Refund Status वर क्लिक करा
स्क्रीनवर लगेच तुमचा रिफंड
स्टेटस दिसेल