भारतातर्फे पाकिस्तानवर दणदणीत विजय – आशिया कपवर भारताची नोंद, पण ट्रॉफी स्वीकारण्यास नकार!

कोलंबो | २८ सप्टेंबर २०२५
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून
आशिया कप आपल्या नावावर केला. मात्र विजयानंतरच्या ट्रॉफी वितरणावेळी मैदानावर हायव्होल्टेज
ड्रामा रंगला. भारतीय संघाने आशिया क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे
गृहमंत्री मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने
भावनिक घोषणा केली. तो म्हणाला –
“मी या मालिकेतील सर्व मॅच फी भारतीय
सैन्याला अर्पण करू इच्छितो. आम्ही संघर्ष करून हा किताब जिंकला आहे. ट्रॉफी
मिळवणं आमचं हक्काचं आहे. पण आज मैदानावर जे घडलं, ते मी
पहिल्यांदाच पाहतोय.”
मैदानावरील नाट्यमय क्षण
- सामना संपल्यानंतर
जवळपास १ तास विलंब झाल्यावर अवॉर्ड सेरेमनी सुरू झाली.
- भारतीय संघाने ना
ट्रॉफी घेतली, ना
मेडल्स स्वीकारले.
- जेव्हा नकवी
व्यासपीठावर आले, तेव्हा
भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी घेण्यास सरळ नकार दिला.
- त्यानंतर
आयोजकांच्या एका सदस्याने ट्रॉफी गुपचूप हटवली.
बीसीसीआयचं जाहीर बक्षीस
भारताच्या विजयानंतर बीसीसीआयने २१ कोटी रुपयांचं बक्षीस संघासाठी
जाहीर केलं. त्यांनी निवेदनात म्हटलं –
“क्रिकेटच्या मैदानावर आमच्या खेळाडूंनी जसा संघर्ष केला, तसाच आमच्या सशस्त्र दलांनीही केला आहे. आज त्याची पुनरावृत्ती झाली.”
भारताने आशिया कप सर्वाधिक ९ वेळा जिंकण्याचा विक्रम कायम
ठेवला आहे. (१९८४, १९८८, १९९०-९१,
१९९५, २०१०, २०१६,
२०१८, २०२३, २०२५)
हायलाइट्स
- भारताने पाकिस्तानचा
पराभव करून ९व्यांदा आशिया कप जिंकला
- भारतीय संघाने
नकवींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला
- सूर्यकुमार यादवने
मॅच फी भारतीय सैन्याला दान करण्याची घोषणा केली
- बीसीसीआयकडून
संघासाठी २१ कोटींचं बक्षीस जाहीर