संगमेश्वर कॉलेजमध्ये अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन व डिजिटल बँकिंगवर व्याख्यान

सोलापूर, दि. 11 ऑगस्ट 2025 – श्री संगमेश्वर शिक्षण संस्थेच्या संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त), सोलापूर येथील अर्थशास्त्र विभागात अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. स्वप्निल संजयराव रत्नपारखी, उपशाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅम्प शाखा, सोलापूर उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी ‘डिजिटल बँकिंग’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी डिजिटल बँकिंगचे महत्त्व, ग्राहकांना मिळणारे फायदे, तोटे आणि सुरक्षितता, तसेच नगदरहित व्यवहार प्रणालीमुळे होणारी आर्थिक गती यावर सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संगीता कामत यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रेश्मा शेख व वक्त्यांची ओळख डॉ. अविनाश जमा यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. युवराज सोलापूरे यांनी मानले. तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन डॉ. प्रवीण राजगुरू व डॉ. संतोष मेटकरी यांनी केले. दरम्यान महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी श्री. रेवप्पा कोळी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्याकडून उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार आणि अर्थशास्त्र विषयात पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधत डिजिटल बँकिंगविषयी त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.