खोकेवाले डोक्यावर बसले नसते तर मीच शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले असते : उद्धव ठाकरे
संभाजी नगर : "प्रत्येक
संकटात शिवसेना शेतकर्यांच्या पाठिशी आहे. कर्जमुक्ती होईंपर्यंत सरकारला
सोडणार नाही. पूरग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत शेतकर्यांना
मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत खोकेवाले डोक्यावर बसले
नसते तर मीच कर्जमुक्ती केली असती. आमचा हंबरडा मोर्चा नाही तर इशारा मोर्चा आहे,
अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल
केला. मी मुख्यमंत्री असताना शेतकर्यांना कर्जमुक्त करून दाखवले होते. नियमित
पैसे परत फेड करणाऱ्यांना आपण ५० हजार देणार होतो मात्र मध्येच कोरोनाचे संकट आले
त्यामुळे काही काही काळ पैशे देऊ शकलो न्हवत.द्यायला सुरुवात करायची होती तर
यांनी खोके घेऊन सत्ता पाडली, असे सांगत हा हंबरडा मोर्चा
नाही इशारा मोर्चा आहे. जर कर्जमुक्ती केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी
रस्त्यावर उतरवू, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. आज
शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाच्या वतीने संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर हंबरडा मोर्चा
काढण्यात आला. उद्धव ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व केले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी
राज्य सरकारच्या मदतीच्या धोरणावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की,
"ज्यांनी ५० खोकी घेतली त्यांच्याकडे आम्ही पूरग्रस्त
शेतर्यांना हेक्तरी ५० हजार रुपयांची मदत आम्ही त्यांच्याकडे ५० हजारु रुपये
शेतकर्यांना द्यावेत अशी मागणी करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत
विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले. या कार्यक्रमात कोणीही शेतकर्यांच्या
मदतीबाबत बोलले नाही." मी संभाजीनगर मधे मुख्यमंत्र्यांची होर्डिंग्ज पाहिली,
शेतकरी फोटो ऐवजी सतरंज्या उचलण्याचे होते. स्वतःच स्वतःची पाठ
थोपटून घेण्याचा हा प्रकार आहे. पूरग्रस्त शेतकर्यांसाठी आम्ही ३१ हजार कोटी
रुपयांचे आजवरचे इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज जाहीर केले, असे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस सांगत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने
मारलेली सर्वात मोठी थाप आहे, हे शेतकर्यांसाठी इतिहासातील
मोठ पॅकेज नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.