दिवसाढवळ्या आपल्या पत्नीवर पतीकडून प्राणघातक हल्ला

विजयपूर: जिल्ह्यातील सिंदगी शहरातील आनंद टॉकीज जवळ दिवसाढवळ्या आपल्या पत्नीवर प्राणघातक शस्त्राने हल्ला करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेची ओळख अनसूया मादर* अशी झाली असून, हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव यमणप्पा मादर असे आहे. रस्त्याच्या मध्यभागीच चाकू धरून केलेल्या या हल्ल्याचे भीषण दृश्य मोबाईलमध्ये कैद झाले आहे. अचानक पत्नीवर हल्ला करताच तेथील लोकांनी तिचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपीने त्यांच्याही दिशेने शस्त्र दाखवले. तरीही काही युवकांनी दगड व लाकडी दांड्यांच्या साहाय्याने आरोपीला पकडून अनर्थ टाळण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सिंदगी तालुका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंदगी पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला आहे.