हुमा कुरेशीच्या चुलत भावाची निर्घृण हत्या; CCTVमध्ये थरकाप उडवणारा हल्ला कैद

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना दिल्लीच्या जंगपुरा भोगल बाजार लेनमध्ये घडली आहे.

पार्किंगच्या किरकोळ वादातून आसिफवर दोन तरुणांनी धारदार शस्त्रांनी अनेकवार वार करून ठार मारले. या घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये आरोपी दिसून येत आहेत. हल्ला झाल्यानंतर स्थानिक लोक आणि आसिफची पत्नी प्रसंग शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, आरोपींनी आसिफला थांबवता न येता जबरदस्त मारहाण सुरूच ठेवली. गंभीर जखमी झालेल्या आसिफला रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

आरोपी कोण?

  • उज्ज्वल (१९) आणि गौतम (१८) हे दोघेही सख्खे भाऊ आहेत.
  • उज्ज्वलने पहिला हल्ला केला, त्यानंतर गौतमनेही आसिफच्या छातीवर वार केले.
  • नातेवाईकांच्या मते, यापूर्वीही आसिफवर हेतुपूर्वक भांडण करत हल्ला करण्याचे प्रयत्न झाले होते.

 घटनेचा क्रम:

1.       स्कूटर गेटसमोर पार्क करण्यावरून वाद

2.      शिवीगाळ आणि हातघाई

3.      आसिफच्या पत्नीने हस्तक्षेप केला

4.      उज्ज्वल आणि गौतमने धारदार शस्त्राने हल्ला केला

5.      CCTV मध्ये संपूर्ण घटना कैद