"जुळे सोलापुरात मुसळधार पाऊस, सखल भाग पाण्याखाली"

रविवारी दुपारी चार वाजता जुळे सोलापूर शहराला उत्तरा नक्षत्राच्या पावसाने झोडपून काढले. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या पावसामुळे शहराच्या काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिले आहे. जुळे सोलापूरच्या अनेक नगरांमध्ये पाणीच असल्याने लोकांच्या घरात पाणी शिरले आहेत. बुधवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शहरातील शेकडो लोकांच्या घरात पाणी शिरले होते. आता पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने लोकांच्या घरात शिरलेले पाणी बाहेर काढणे कठीण आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिना सोलापूर साठी मुसळधार पावसात असणार आहे. या पावसाने विजापूर रस्त्यावरील सैफुल नजीकच्या स्वामी विवेकानंद नगर दोन मध्ये अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.