सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर पावसाचे पाणी
सोलापूर - सोलापुरात मध्यरात्री तुफान पाऊस झाला असून अक्कलकोट रस्त्यावर एसव्हीसीएस शाळेच्या पुढे काही अंतरावर असलेल्या पंचवाणी मार्केटजवळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. त्यातूनच वाहनधारकांना मार्ग काढावा लागत आहे. तर सर्विस रोड पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पंजवानी मार्केटमध्ये कंबरे एवढे पाणी साचले आहे.