अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर भीषण चकमक; तालिबानचा दावा — पाकिस्तानी सैन्याने १५ मिनिटांत शरणागती पत्करली!

काबूल / इस्लामाबाद :
काही दिवसांच्या शांततेनंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. मंगळवारी रात्री उशिरा खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यात तीव्र चकमक झाली. 
या संघर्षात अफगाण तालिबानने मोठा दावा करत सांगितले की, फक्त १५ मिनिटांच्या लढाईनंतर पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली आणि त्यांची शस्त्रे तालिबानकडून जप्त करण्यात आली.

 तालिबानचा दावा : पाकिस्तानी सैनिकांनी १५ मिनिटांत आत्मसमर्पण केलं

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दाखवले गेले आहे की, स्पिन बोल्डक भागात झालेल्या चकमकीदरम्यान तालिबान लढवय्यांनी पाकिस्तानी सैनिकांची शस्त्रे हिसकावून घेतली. तालिबान प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, “फक्त काही मिनिटांतच पाकिस्तानी सैन्याने आत्मसमर्पण केले आणि आमच्या सैन्याने सीमावर्ती चौक्या ताब्यात घेतल्या.”

 स्थानिकांवर संकट : घरे उद्ध्वस्त, नागरिक विस्थापित

स्पिन बोल्डक जिल्ह्याचे माहिती प्रमुख अली मोहम्मद हकमल यांनी सांगितले कीदोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे. अनेक स्थानिकांचे घरे उद्ध्वस्त झाली असून, नागरिकांना स्थलांतर करावे लागत आहे.” स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ड्युरंड रेषेजवळील गावांमधील अनेक घरे कोसळली, आणि रहिवाशांनी मोठ्या प्रमाणावर पलायन केले आहे.

 मोठ्या प्रमाणात जीवितहानीचा संशय

अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य कबीर हकमल यांनी सांगितले कीस्पिन बोल्डक परिसरात झालेल्या चकमकींमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. काही ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने तोफगोळे ड्युरंड रेषेच्या आत टाकले आहेत.” तथापि, या संघर्षावर अद्याप दोन्ही देशांच्या अधिकृत लष्करी प्रवक्त्यांकडून कोणतेही निवेदन आलेले नाही.

 पार्श्वभूमी : तणाव वाढण्याचे कारण

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संबंध गेल्या काही महिन्यांपासून तणावपूर्ण आहेत. पाकिस्तानने सीमावर्ती भागातील अवैध अफगाण नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू केल्यानंतर तालिबानने अनेकदा सीमापार हल्ल्यांचा इशारा दिला होता.