सोलापुरात आरटीओ व मोटर ड्रायव्हिंग असोसिएशनतर्फे 'हर घर तिरंगा' अभियान रॅली

सोलापूर :
आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सोलापूर व मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 14 ऑगस्ट 2025 दरम्यान तिरंगा जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या निमित्ताने सोलापूर शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये अनेक वाहनचालक, प्रशिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रॅलीत सहभागी सर्वांनी राष्ट्रीय ध्वज गाडीवर लावून सोलापुरातून आरटीओ पासून शहरात विविध भागांमध्ये भव्य रॅलीचे मनाला भारावून टाकणारे आयोजन करण्यात आलेले दिसून आले त्याचबरोबर सर्वांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या आणि तिरंग्याचे महत्त्व जनमानसात पोहोचवले.
या रॅलीचा उद्देश नागरिकांना घराघरात तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करणे, देशभक्तीची भावना वृद्धिंगत करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पसरवणे हा होता. या उपक्रमाला स्थानिक प्रशासन, वाहतूक पोलीस अधिकारी वर्ग व इतर कर्मचारी वर्ग यांचाही सहभाग व सहकार्य लाभले.