संगमेश्वर कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्य अभ्यास मंडळाचे भव्य उद्घाटन

सोलापूर, दि. १२ ऑगस्ट २०२५ –श्री
संगमेश्वर शिक्षण संस्थेच्या संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त), सोलापूर येथील इंग्रजी विभागात इंग्रजी साहित्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन
मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रो. डॉ. मनोहर जोशी,
उपप्राचार्य (कला शाखा) व इंग्रजी विभाग प्रमुख, वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् अँड
सायन्स, सोलापूर होते. प्रमुख पाहुण्यांनी भाषा, साहित्य, संस्कृती, राष्ट्रीय
शिक्षण धोरण २०२० आणि आउटकम बेस्ड या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
त्यांनी विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचा अभ्यास केवळ विषयापुरता न ठेवता, तो जागतिक संवाद, सांस्कृतिक सेतू आणि सर्वांगीण
प्रगतीसाठी साधन म्हणून स्वीकारावा, असे सांगितले. तसेच,
एनईपी २०२० अंतर्गत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिकण्याचे ठोस परिणाम
साध्य करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी
प्राचार्य डॉ. आर. पी. बुवा यांनी भूषविले. सूत्रसंचालन कु. रुचा बिराजदार, कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. रेवनसिद्ध हालोळी, प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. वैभवी मसूती तर अध्यक्षीय भाषण प्रो. डॉ.
सुहास पुजारी (उपप्राचार्य) कला शाखा आणि आभार प्रदर्शन कु. देवणी नूजत यांनी
मांडले. सालाबादप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास करण्यासाठी इंग्रजी
विभागाचा Excellence Issue – I हा वार्षिक अंक प्रकाशित
करण्यात आला, जो कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या ८४ व्या
पुण्यतिथीला समर्पित होता.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राज्यशास्त्र विभागातील
प्रा. डॉ वसंत कोरे , कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक देसाई
यांची होती, तर इंग्रजी विभागातील डॉ.मकानदार, डॉ.पाटील, प्रा.
शेळगे, प्रा. शिंदे,
प्रा. नारा प्रा. अष्ट्टे आदींनी कार्यक्रम पूर्णत्वास
नेण्यास परिश्रम घेतले.