१ लाखांचे बक्षीस असलेला गॅंगस्टर आजमगढमध्ये एसटीएफच्या चकमकीत ठार

आझमगढ (उत्तर प्रदेश) | १ लाख रुपयांचे बक्षीस असलेला कुख्यात गॅंगस्टर शंकर कनौजिया शनिवारी झालेल्या एसटीएफच्या चकमकीत ठार झाला. ही चकमक जहानागंज पोलिस स्टेशन परिसरात झाली. काय घडलं? चकमकीदरम्यान शंकर कनौजियाने पोलिसांवर गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या प्रत्युत्तरात झालेल्या गोळीबारात तो ठार झाला.
शस्त्रसाठा जप्त या कारवाईत पोलिसांनी कनौजियाकडून एक कार्बाइन, एक पिस्तूल आणि अनेक काडतुसे जप्त केली आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी शंकर
कनौजिया हा आझमगढच्या रौनापार पोलिस स्टेशन परिसरातील हाजीपूर गावचा रहिवासी होता.
तो २०११ पासून फरार होता आणि त्याने दरोडा, खून व अपहरण
यासारखे गंभीर गुन्हे केले होते. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याने
वाराणसी झोनचे एडीजी पीयूष मोरडिया यांनी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिस
तपास एसटीएफने दिलेल्या माहितीनुसार, चकमकीनंतर परिसरात
शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, इतर साथीदारांविरुद्ध तपास
सुरू आहे.