गांधी जयंतीचे औचित्य साधून संगमेश्वर महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन

सोलापूर (प्रतिनिधी) – संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर व गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी विचार संस्कार परीक्षा – 2025 आज महाविद्यालयात यशस्वीरीत्या पार पडली. या परीक्षेत पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी तसेच शिक्षक-प्राध्यापकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.  विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त लाभला.

तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष गौरव करण्यात येणार आहे. या परीक्षेच्या आयोजनासाठी डॉ. सुनीता सरवदे व डॉ. रेशमा शेख समन्वयक म्हणून कार्यरत होत्या.  डॉ. ऋतुराज बुवा प्र. प्राचार्य, डॉ. सुहास पुजारी उपप्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले. परीक्षा यशस्वीपणे पूर्णत्वास नेण्यासाठी डॉ. शीला रामपुरे, डॉ. सविता देवसाने, प्रा. सतीश हेगडे आणि डॉ. प्रवीण राजगुरू यांनी विशेष परिश्रम घेतले. गांधीजींच्या विचारांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, नैतिकता व सामाजिक बांधिलकी दृढ करण्याच्या उद्देशाने ही परीक्षा पार पडली. सशक्त बलशाली वैचारिकदृष्ट्या समृद्ध व अहिंसक समाज निर्मितीसाठी अहिंसा प्रेम साधी राहणे व शांततेचा संदेश अखिल विश्वाला देणाऱ्या महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान पुढील पिढीला प्रेरणा देणे आवश्यक ठरते.