नवरात्री निमित्त सोलापुरात मुली व महिलांसाठी मोफत स्पोकन इंग्रजी क्लासेस

सोलापूर, १८ सप्टेंबर : नवरात्रीच्या
नऊ दिवसांच्या कालावधीत मुली आणि महिलांकरिता इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण मिळावे
आणि आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि न्यू एलिक्सिर
स्पोकन इंग्लिश क्लासेस, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत
इंग्रजी क्लासेस आयोजित करण्यात येत आहेत.
हे क्लासेस २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होणार आहे. यात सहभागी
होणाऱ्या महिलांना इंग्रजी संवाद कौशल्यात प्रगती करण्यास मदत होईल. आयोजकांनी
सांगितले की, “नवरात्रीच्या उत्सवात महिलांनी आनंद घेतानाच
इंग्रजी भाषेतही भरारी घ्यावी, हा या उपक्रमामागचा उद्देश
आहे.” घरातील आई, बहिणी, मैत्रीणींसह
महिला बचत गट, भिशी ग्रुप यांना या मोफत शिकवणीचा लाभ
घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे क्लासेस
जुना एम्प्लॉयमेंट चौक, कामतकर क्लासेस जवळ, कामत हॉटेल मागे, सोलापूर येथे घेण्यात येणार आहेत.
तरी या सुवर्ण संधीचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा
असे आवाहन रो. धनश्री केळकर, अध्यक्षा आणि रो. निलेश फोफलिया
सेक्रेटरी - रोटरी क्लब ऑफ सोलापूर, तसेच सौ. स्नेहल साखरे
आणि सौ. सुखदा कामतकर संचालिका एलिक्सिर स्पोकन इंग्लिश यांनी केले आहे. 9145551551 / 9049175662